-->
शेतकर्‍याची दुदैवी कहाणी

शेतकर्‍याची दुदैवी कहाणी

सोमवार दि. 12 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
शेतकर्‍याची दुदैवी कहाणी
लसणाला अवघा चार रूपये हमीभाव मिळाल्याचं ऐकताच शेतकर्‍याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या कोटामध्ये घडली आहे. सत्यनारायण मीना हा 32 वर्षांचा शेतकरी कोटाच्या बाजार समितीत शेतात पिकवलेला लसूण विकण्यासाठी आला होता. परंतु त्याला अवघा चार रूपये हमीभाव मिळाल्याचं त्याला समजले आणि तो जागीच कोसळला. राजस्थानच्या रोईन या गावात वास्तव्यास असलेला सत्यनारायण तेथे शेती करीत होता. आपण कमविलेल्या मालाला कवडीमोल किंमत येत असल्याचे समजताच तो जागेवरच कोसळला तेव्हा त्याला तातडीने कोटामधल्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिथेच त्याला मृत घोषित केले. शेतकरी शेतात घाम गाळून कष्ट करून पिक आणतो. मात्र बाजार समित्यांमध्ये त्याची दलाल क्रूर थट्टा करतात. अवघ्या 32 वर्षांच्या शेतकर्‍याला जिथे हा झटका सहन झाला नाही तिथे इतर शेतकर्‍यांचे काय होत असेल त्याचा विचारच न केलेला बरा. निदान या शेतकर्‍याच्या मृत्यूला तरी सरकारला जाग आणेल का असा प्रश्‍न आता इतर शेतकरी विचारत आहेत. सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह देशातले शेतकरी उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत हमी भावाव्दारे हातात आल्यामुळे हवालदिल झाले आहेत. महााष्ट्रात शेतकर्‍यांची कर्जमाफी आणि शेतमालाला मिळणारा अयोग्य हमीभाव याविरोधात आंदोलन सुरू आहे. कर्जमाफी देऊ अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. मात्र कोणताही ठोस निर्णय नाही. मध्यप्रदेशातही शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून संघर्ष सुरूच आहे. मध्यप्रदेशात कर्जमाफी मागण्यार्‍या शेतकर्‍यांवर गोळीबार झाला आहे. त्यात पाच शेतकर्‍यांचे बली गेले आहेत. राज्य सरकारने एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. परंतु पैशाने गेलेला शेतकर्याचा जीव पुन्हा हाताशी येईल का, असा प्रश्‍न आहे. महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्याही करत आहेत. रोज शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. सरकार मात्र या सगळ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कर्जमाफी होणार की नाही ? हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीतच आहे.
---------------------------------------------------

0 Response to "शेतकर्‍याची दुदैवी कहाणी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel