-->
आपली मनोवृत्ती कधी बदलणार?

आपली मनोवृत्ती कधी बदलणार?

शुक्रवार दि. 26 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
आपली मनोवृत्ती कधी बदलणार?
अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत हजर झाली आणि मुंबई-गोवा हा प्रवास तब्बल आठ तासांवर आला. सर्वात महत्वाचे म्हणजे हा प्रवास अतिशय सुखकारक होणार आहे. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या समृध्द असलेल्या गोव्यात पर्यटकांचा ओघ वाढणार, तसेच याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा हा कोकण किनारपट्टीलाही होणार आहे. तेजस एक्स्प्रेसमधील सोयी-सुविधा लक्षात घेता याचे तिकिट थोडे महाग आहे, मात्र हे तिकिट देऊनही प्रवास करणारे प्रवासी आपल्याकडे आहेत, त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे पुढील चार-पाच दिवसांचे आरक्षणदेखील फुल्ल आहे. अशा प्रकारची सुंदर रेल्वे सुरु केल्याबद्दल कोकण रेल्वेचे आभार मानीत असताना त्यातील प्रवाशांच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन या निमित्ताने झाले आहे. बेशिस्त प्रवाशांमुळे तेजसमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला आहे. प्रवाशांनी आसनांखाली फेकलेले उष्टे खाद्यपदार्थ तसेच बायो शौचालयांचा केलेला गैरवापर यामुळे तेजसमध्ये पहिल्य दोन दिवसातच अस्वच्छता व दुर्गंधी पसरली. तेजसमध्ये मोफत वाय-फाय, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. मात्र मुंबई ते करमळी हा प्रवास करणार्‍या काही प्रवाशांनी एलईडी स्क्रीनसह दिलेल्या हेडफोन्सवर गायब कल्याचेे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. प्रवाशांनी अनेक आसनांखाली उष्टे खाद्यपदार्थ आणि तत्सम फेकलेल्या वस्तूंमुळे गाडी कमालीची अस्वच्छ झाली होती. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असल्यामुळे हा वास अधिकच पसरला. ट्रेनमधील बायो-शौचालयांचा वापर अयोग्य केल्यामुळे शौचालयांमध्येही दुर्गंधी पसरली. या गाडीमध्ये असलेल्या स्वयंचलित दरवाजामुळे एक प्रवासी रत्नागिरी स्टेशनवरच राहिल्याचे नजरेस आले. स्वयंचलित दरवाजे हे चोर्‍या आणि अन्य घातपाताच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी असल्याने त्याचा उपयोग हा होणारट आहे. कोणत्याही स्टेशनवर ट्रेन सुटताच धावत जाऊन ती पकडण्याच्या प्रवासांच्या मानसिकतेमुळे एक प्रवासी खालीच राहिली. ही त्याची पूर्णत: चूक आहे. त्याचबरोबर बायो शौचालयाचा गैरवापर, खाद्य पदार्थ डब्यातच टाकणे, हेडफोन्स गायब करणे ही प्रवाशांची मनोवृत्ती अतिशय वाईटच म्हटली पाहिजे. त्यामुले आपण आपल्या रेल्वे चांगल्या केल्या तरी प्रवाशांनी त्यांचा वापर चांगला ठेवला पाहिजे. यासाठी प्रवासांची मनोवृत्ती बदलण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे रेल्वेने काही मोजक्या स्थानकांवर सरकते जीने सुरु केले त्यावेळी देखील त्याचा गैरवापर करुन ते बिघडवून ठेवले होते. युरोपातील युरो रेलमध्ये जी स्वच्छता असते, ती तेथील प्रवासीच ठेवतात. आपल्याकडे अशी प्रवाशांची मनोवृत्ती कदी होणार हा सवाल आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "आपली मनोवृत्ती कधी बदलणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel