-->
यंदाही मुलींचीच बाजी

यंदाही मुलींचीच बाजी

गुरुवार दि. 1 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
यंदाही मुलींचीच बाजी 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 89.50 टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 3 टक्क्यांनी वाढली आहे. निकालामध्ये यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून पुणे विभाग तिसर्‍या क्रमांकावर तर मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. कोकणातील मुलींनी सलग सहाव्या वर्षी विक्रमी कामगिरी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे सायबर कॅफेमध्ये एकच गर्दी उसळली होती. परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांमध्ये अव्वल ठरण्याची परंपरा कोकण विभागाने यंदा कायम राखली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एकूण 14 लाख 29 हजार 478 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 12 लाख 79 हजार 406 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 73 हजार 926 पुनर्परीक्षार्थींपैकी 29 हजार 779 उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी 40.83 टक्के इतकी आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 93.01 टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातही मुलींची कामगिरी लक्षणीय झाली आहे. जिल्ह्यात 15 हजार 783 मुलींनी अर्ज भरले होते. त्यापैकी परिक्षेत्रा 15 हजार 770 मुली परिक्षेला बसल्या. तर त्यापैकी 14 हजार 722 मुली पास झाल्य. उर्त्तीण होण्याचे मुलींचे प्रमाणे हे 93.35 टक्के एवढे झाले आहे. तर मुलांचे उर्त्तीण होण्याचे प्रमाण हे 85.53 टक्के एवढे आहे. एकूण निकालाचा विचार करता, मुली एकूण 93.05 टक्के उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 86.65 टक्के एवढे आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 93.01 टक्के लागला. एकूण 162 विषयांची परीक्षा झाली, त्यापैकी 11 विषयांत सर्व मुले पास झाली आहेत. खासगीरीत्या परीक्षेत बसलेले 68.46 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  मुलांना कठीण वाटणार्‍या विज्ञान शाखेतील 95.85 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर वाणिज्य शाखेतील 90.57 मुले पास झाली. कला शाखेतून 81.91 टक्के मुले पास झाली. तर व्यवसाय अभ्यासक्रम 86.27 टक्के मुले उर्त्तीण झाली. खासगीरीत्या परीक्षा देणार्‍यांपैकी 68.46 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी गेल्या दशकात आपला विजयाचा जोरदार धडाका लावला आहे, ही बाब स्वागतार्ह म्हटली पाहिजे. एकीकडे मुलींचा गर्भातच खून केला जातोे व त्यातून ज्या काही जगतात त्या अशा प्रकारे धडाडीने शिकून पुढे येत आहेत. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत मुली शिक्षणात पुढे येत असल्याचे आपल्याला दिसते, ही बाब स्वागतार्ह म्हटली पाहिजे. कारण ज्यांना मुलींपेक्षा मुलाचे महत्व जास्त वाटते त्यांना मुलींच्या या कार्याचा गौरव दिसला पाहिजे. आपण तरी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात राहून मुलींच्या कार्याचा गौरव करतो, मात्र बिहारसारख्या मागास भागातही ज्यावेळी सरकारने मुलींना सायकली वाटण्यास सुरुवात केली होती त्यानंतर मुलींच्या शिक्षणात लक्षणीय वाढ झाल्याचे आढळले होते. त्यामुळे मुलींना आपण जरा काही प्रोत्साहन दिले तर मुली कोणत्याही क्षेत्रात बाजी मारु शकतात, हे आपल्याला अनेक क्षेत्रात दिसतच आहे. बारावीच्या पास झालेल्या मुलांचे अभिनंदन करताना खास करुन मुलींचे अभिनंदन करावेसे वाटते.

0 Response to "यंदाही मुलींचीच बाजी "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel