-->
डेक्कन क्विन नाबाद 88

डेक्कन क्विन नाबाद 88

शुक्रवार दि. 2 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
डेक्कन क्विन नाबाद 88
पुणे रेल्वे स्थानकावरून 7 वाजून 15 मिनिटांच्या ठोक्याला सुटणार्‍या डेक्कन क्वीनला आज 88 वर्षे पूर्ण झाली आहेत. डेक्कन क्वीन ही दख्खनची राणी म्हणूनही प्रसिद्ध आहे. या दख्खनच्या राणीने दररोज प्रवास करुन आपल्या पोटासाठी धावपळ करणार्‍यांची संख्या हजारो आहे. या प्रवाशांसाठी डेकेकन क्वीन ही जीवनवाहिनी आहे. डेकेकन क्वीन 1 जुन 1930 रोजी ही रेल्वे पहिल्यांदा धावली. त्यापूर्वी ही रेल्वे कल्याण ते पुणे धावत होती. त्यानंतर सीएसटीपर्यंत ती धावायला लागली. डेक्कन क्वीन ही त्याकाळातील आशियातील सर्वात वेगवान रेल्वे होती. या गाडीला एकूण 17 डब्बे आहेत. त्यापैकी एक डब्बा महिलांसाठी राखीव, दोन वातानुकूलित, यातील काही डबे पास धारकांसाठी राखीव आहेत. पास धारकांसाठी ही गाडी अपवादात्मक आहे. 120 कि.मी पुढे गाडी जात असेल तर त्यासाठी पास देण्यात येत नाही. मात्र, डेक्कन क्वीनला यातून वगळण्यात आले आहे. आजही ही रेल्वे 192 कि.मी. या वेगात धावत आहे. महिलांसाठी पहिल्यांदा या रेल्वेमध्ये आरक्षित डब्बा ठेवण्यात आला. तसेच देशातील पहिली विद्युतीकरणावर चालणारी रेल्वे आणि आयएसओ क्रमांक मिळवणारी रेल्वे ठरली आहे. मुंबई-पुणे महामार्ग तसेच दर अर्ध्या तासाला सुटणार्‍या दादर-पुणे एशियाड सेवा या गेल्या वीस वर्षात सुरु झाल्या असल्या तरीही डेक्कन क्वीनची शान, तिचे महत्व काही कमी झालेले नाही. आजही ही गाडी प्रवाशांसाठी एक सुखद अनुभव असतो. नेहमी वेळ पाळणारी डेक्कन क्वीन क्वचितच विलंबाने धावते. कारण तिला उशीर करुन चालतही नाही. कारण तिच्यात असलेल्या प्रवाशांना कार्यालये गाठायची असतात. पुण्याहून सकाली निघालेली ही टे्रन पकडून लोक थेट कार्यालये गाठतात व तशीच संध्याकाळी ही ट्रेन निघताना पुन्हा पुण्याचा परतीचा प्रवास करतात. अनेकांचे हे शेड्यूल वर्षानुवर्षाचे आहे व डेक्कन क्वीन कोणताही खंड त्यात पडू देत नाही. मुंबई-पुणे महामार्ग झाल्यवर ही गाडी बंद पडेल किंवा तिचे महत्व तेवढे राहाणार नाही असा अनेकांचा होरा होता. मात्र हा होरा काही खरा ठरला नाही व डेक्कन क्विनचा दिमाख कायमच राहिला. अर्थातच भविष्यातही हा दिमाख कामयच असेल, याबाबत काहीच शंका नाही.
---------------------------------------------------

0 Response to "डेक्कन क्विन नाबाद 88"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel