-->
पेट्रोल 30 रुपयांवर?

पेट्रोल 30 रुपयांवर?

शनिवार दि. 27 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पेट्रोल 30 रुपयांवर?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल व डिझेलचे दर कमी करुन दाखविणार अशी घोषणा केली होती. मात्र गेल्या तीन वर्षात तरी त्यांना जागतिक बाजारात पेट्रोलियम पदार्थांचे दर घसरुनही आपल्या देशात काही यांचे दर कमी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अच्छे दिन काही आलेले नाहीत. मात्र आता विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे पाच वर्षांनंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर 30 रुपये असू शकतात. अमेरिकेचे प्रख्यात भविष्यवेधते टोनी सीबा यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील येत्या काळातील बदल लक्षात घेऊन पाच वर्षांमध्ये पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात घसरतील, असा दावा केला आहे. जगात सौरऊर्जेचा बोलबाला होईल, अशी भविष्यवाणी टोनी सीबा यांनी खूप आधीच केली होती. सीबा यांनी ज्यावेळी ही भविष्यवाणी केली, त्यावेळी सौरऊर्जेचे दर आताच्या दरांच्या तुलनेत 10 पट जास्त होते. त्यांंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि सौरऊर्जेच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. आता जगभरात सौरऊर्जा पेट्रोलियम पदार्थांसाठी एक चांगला पर्याय ठरते आहे. टोनी सीबा हे सिलिकॉन व्ह्रॅलीतील एक मोठे व्यावसायिक आहेत. यासोबतच सीबा स्टॅनफोर्ड महाविद्यालयात अपारंपारिक ऊर्जेशी संबंधित विषयांचा अभ्यास करतात. स्वयंचलित वाहनांमुळे जगभरातील पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये जबरदस्त घट होईल. त्यामुळे तेलाचे दर 25 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरतील, असे टोनी सीबा यांचे मत आहे. पेट्रोलचे दर 30 रुपये किंवा त्यापेक्षाही खाली आल्यास भारतीयांना मोठा आनंद होईल व अच्छे दिन आल्याचा भास होईल. 2020-21 मध्ये जगभरात तेलाची मागणी सर्वाधिक असेल. त्यामुळे तेलाचे दर 100 मिलियन प्रति बॅरलवर पोहोचतील. मात्र त्यानंतर तेलाचे दर घसरण्यास सुरुवात होईल. आगामी 10 वर्षांमध्ये तेलाच्या मागणीत घट होईल. त्यामुळे तेलाचे दर 70 मिलियन प्रति बॅरलवर येतील. म्हणजेच जगभरात 25 डॉलर प्रति बॅरल दराने तेल उपलब्ध असेल. हे जर खरे झाले तर पेट्रोल भारतात 30 रुपयांनी मिळाले पाहिजे. त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरो...
-----------------------------------------------

0 Response to "पेट्रोल 30 रुपयांवर?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel