-->
आता दोनच वर्षे राहिली...

आता दोनच वर्षे राहिली...

रविवार दि. 14 मे 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
आता दोनच वर्षे राहिली...
------------------------------------
एन्ट्रो- गेल्या तीन वर्षात अच्छे दिन काही या देशातील जनतेला दिसलेले नाहीत. त्यामुळे आता जी दोन वर्षे शिल्लक राहिली आहेत, त्यात तरी मोदींनी आश्‍वासन दिलेले अच्छे दिन दिसणार का, हा सवाल सर्वात प्रथम जनतेला भेडसावीत आहे. केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या तीन वर्षात केलेल्या दहा चांगल्या गोष्टी जर कुणाला विचारल्या तर त्या सांगता येणार नाहीत. त्यामुळे अच्छे दिन तर दूरच राहो. फक्त सरकारने जी काही कामे केली आहेत त्याची भरभरुन प्रसिध्दी मात्र केल्याने ही कामे मोठी वाटतात. त्यासाठी सरकारने तब्बल अकरा हजार कोटी रुपये खचर्र् केले आहेत. सरकारचा प्रचार मात्र जोरात आहे, एवढे मात्र आपण नक्की सांगू शकतो. विधानसभांच्या निवडणुकीचा विचार करता आसाम व उत्तरप्रदेशातील विजय हीच काय ती मोदींची जमेची बाजू आहे. पंजाब, गोवा व मणिपूरमध्ये भाजपला यश मिळालेले नाही. गोवा व मणिपूरातील यश हे त्यांनी हिसकावून घेतलेले आहे. गेल्या तीन वर्षात सरकारने सर्वत्र भगवीकरण सुरु केले आहे. सर्वधर्मसमभाव जपणारा आपला देश हिंदुराष्ट्र करण्याच्या दृष्टीने मागच्या पावलाने तयारी चालू आहे, असेच सरकारच्या हालचालींवरुन दिसते. भाजपाची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडाच आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाची झालर लावत हिंदुराष्ट्र करण्याचा हा डाव जनता सहन करणार नाही. कारण त्यामुळे आपल्या संविधानालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे...
--------------------------------------- 
केंद्रातील भाजपा सरकारला विजयश्री प्राप्त झाली त्याला आता उद्या तीन वर्षे पूर्ण होतील. यानंतर दहा दिवसांनी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला होता. मोठ्या अपेक्षेने जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हातात सरकारची सुत्रे दिली त्या घटनेला तीन वर्षे झाल्याने आता सरकारच्या कामाचा लेखाजोखा करण्याची हीच योग्य वेळ आहे असे म्हणता येईल. सरकारने अच्छे दिन येणार अशी मोठी घोषणाबाजी केली होती. मात्र गेल्या तीन वर्षात अच्छे दिन काही या देशातील जनतेला दिसलेले नाहीत. त्यामुळे आता जी दोन वर्षे शिल्लक राहिली आहेत, त्यात तरी मोदींनी आश्‍वासन दिलेले अच्छे दिन दिसणार का, हा सवाल सर्वात प्रथम जनतेला भेडसावीत आहे. केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या तीन वर्षात केलेल्या दहा चांगल्या गोष्टी जर कुणाला विचारल्या तर त्या सांगता येणार नाहीत. त्यामुळे अच्छे दिन तर दूरच राहो. फक्त सरकारने जी काही कामे केली आहेत त्याची भरभरुन प्रसिध्दी मात्र केल्याने ही कामे मोठी वाटतात. त्यासाठी सरकारने तब्बल अकरा हजार कोटी रुपये खचर्र् केले आहेत. सरकारचा प्रचार मात्र जोरात आहे, एवढे मात्र आपण नक्की सांगू शकतो. विधानसभांच्या निवडणुकीचा विचार करता आसाम व उत्तरप्रदेशातील विजय हीच काय ती मोदींची जमेची बाजू आहे. सध्या भारतीय जनता पक्षाचे एकहाती वर्चस्व दिसते, तसेच अनेक राज्यांत त्यांना बहुमत मिळाले आहे, तरी हे यश असेच राहील याची खात्री नाही. पंजाब, गोवा व मणिपूरमध्ये भाजपला यश मिळाले नाही. गोवा व मणिपूरातील यश हे त्यांनी हिसकावून घेतलेले आहे. गेल्या तीन वर्षात सरकारने सर्वत्र भगवीकरण सुरु केले आहे. सर्वधर्मसमभाव जपणारा आपला देश हिंदुराष्ट्र करण्याच्या दृष्टीने मागच्या पावलाने तयारी चालू आहे, असेच सरकारच्या हालचालींवरुन दिसते. भाजपाची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडाच आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाची झालर लावत हिंदुराष्ट्र करण्याचा हा डाव जनता सहन करणार नाही. कारण त्यामुळे आपल्या संविधानालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने आपल्या गेल्या वर्षाच्या काळात सर्वात महत्वाचा घेतलेला निर्णय म्हणजे 500 व हजार रुपयांच्या नोटा चलनात बाद केल्या. यामुळे काळा पैसा बाहेर येईल, अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या जातील व बोगस नोटा पुन्हा चलनात येणार नाहीत असे सरकारने जाहीर केले होते. मात्र यातील एकही उद्देश सफल झालेला नाही. सरकारची कोणतीही धोरण जनतेच्या बाजूने नाहीत. महागाई कमी झालेली नाही. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आजही निराशच आहे. त्याच्या आत्महत्येंचा वेग वाढतच आहे. परंतु याची पर्वा भाजपाला व त्यांच्या सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही नाही. आपण प्रचाराच्या बळावर पुन्हा निवडून येऊ अशी जर भाजपाची समजूत आहे तर ती खोटी ठरु शकते. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पराभव होईल, असे वाटत नव्हते. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा 1977 मध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पंचवीस वर्षे सत्तेत येणार नाही, असे अनेकजण म्हणत होते, मात्र जनतेने या दोन्ही वेळी सर्व अंदाज खोटे ठरवले. वाजपेयी सरकारचा पराभव करून मनमोहन सिंग यांचे सरकार आले, तर 25 महिन्यांत इंदिरा गांधींनी पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन केले. सध्या मोदी सरकारमध्ये वाजपेयी यांच्यासारखेच शायनिंग इंडिया सुरू आहे. भाजप समर्थक सर्व संघटनांनी अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून हिंदू मतांचे ध्रुवीकरणाचे राजकारण केल्याचे उत्तर प्रदेश निवडणुकीत दिसले. पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीने अशाप्रकारचे ध्रुवीकरणाचे राजकारण करणे उचित नाही. अल्पसंख्याक समाजामध्ये गोरक्षकांमुळे भीतीचे वातावरण आहे. गोरक्षक हे सरकारी पाठिंब्यावर सध्या उड्या मारताना दिसतात. उत्तर प्रदेश व राजस्थानात गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यांची प्रकरणे घडली. त्यामुळे अल्पसंख्याक समाज भीती व दडपणाखाली आहे. म्हैस मारली तरी गोहत्या केली, असे जाहीर करुन भीती तयार केली जात आहे. गोमांस हे केवळ मुस्लिमच खातात ही चुकीची समजूत आहे. गरीबवर्गाचे ते अन्न आहे, या देशात प्रत्येकाला बकरा, कोंबडी खाणे परवडत नाही, हे वास्तव आहे. दुदैवाने तीन वर्षानंतरही ज्या उमेदीने कॉग्रेस सरकारच्या विरोधात उभी राहिली पाहिजे होती, तेवढी राहीलेली नाही. अजूनही कॉग्रेस पराभूताच्या मानसिकतेच आहे. यातून बाहेर येण्यासाठी कॉग्रेसला कणखर नेतृत्वाची गरज आहे. मोदी हेही कसलेले राजकारणी आहेत, पण त्यांच्या कार्यशैलीतला फरक वाजपेयींपेक्षा पूर्ण भिन्न असा आहे. म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणुकांना बराच वेळ असतानाही एनडीएची बैठक बोलावून मोदींनी स्वत:च्या पंतप्रधानपदाची दावेदारी पक्षाकडून वदवून घेतली. त्यावर घटक दलातील अन्य पक्षांना मान डोलवावी लागली. शिवसेनाही एकाएकी नरम झाली. उद्धव ठाकरेंना मोदी हे आपले मोठे भाऊ आहेत असे म्हणावे लागले. मोदींची पंतप्रधानपदाची दावेदारी पाहून विरोधक हळूहळू जागे होऊ लागले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत जसे भाजपच्या विरोधात नितीशकुमार यांचा जनता दल (सेक्युलर), लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांचे महागठबंधनफ झाले होते त्या धर्तीवर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशात भाजपच्या विरोधात महागठबंधन उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या महागठबंधनात मायावती यांचा बहुजन समाज पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चर्चा व्हावी म्हणून काही नेते बोलू लागले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला धक्का द्यायचा झाल्यास बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांत अधिक जागा महागठबंधनला जिंकाव्या लागतील असे राजकीय गणित आहे. मोदींनी केवळ आश्‍वासने दिली प्रत्यक्षात काहीच केले नाही, अशी लोकांमध्ये प्रबळ भावना निर्माण झाली आहे. मात्र लोकांचा हा आतला आवाज विरोधकांनी पकडून एकजुटीने मोदींचा विरोध केल्यास 2019 चे राजकीय पलटलावरील चित्र वेगळे असू शकते...
-----------------------------------------------------

0 Response to "आता दोनच वर्षे राहिली..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel