-->
टोलचा एक्स्प्रेस दर

टोलचा एक्स्प्रेस दर

शनिवार दि. 25 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
टोलचा एक्स्प्रेस दर 
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या दरांमध्ये करारानुसार त्रवार्षिक वाढ होणार असल्याने 1 एप्रिलपासून या दोन्ही रस्त्यांवरील प्रवास महागणार आहे. द्रुतगती मार्गावर मोटारींच्या टोलमध्ये 35 रुपये, तर महामार्गावर 16 रुपयांची वाढ होणार आहे. द्रुतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर एप्रिल 2002 पासून टोलवसुलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराशी 2004 मध्ये दीर्घ मुदतीचा करार करण्यात आला. त्यानुसार दर तीन वर्षांनी या दोन्ही मार्गावरील टोलच्या रकमेमध्ये वाढ केली जाते. वाहनांच्या प्रकारानुसार व टप्प्यानुसार किती टोल आकारण्यात यावा, हे टोलविषयक करारामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आजपर्यंत चार वेळा टोलमध्ये वाढ झाली आहे. आता 1 एप्रिलपासून पुढील तीन वर्षांकरिता टोलच्या दरांमध्ये अठरा टक्क्यांची वाढ होणार आहे. टोलवसुलीच्या करारामध्ये संबंधित ठेकेदाराला द्रुतगती मार्गावर 2869 कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यासाठी सप्टेंबर 2019 पर्यंतची कालमर्यादाही देण्यात आली आहे. मागील दहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी टोलमधून अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याने करारात दिलेले लक्ष्य मुदतीआधीच पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत ठेकेदाराला 3007 कोटी रु. टोल मिळाल्याची आकडेवारीही जाहीर झाली आहे. आता खरे तर रस्त्याचा खर्च निघाला असतानाही अजून टोल का वाढविला जातो? तसेच भाजपा-शिवसेना युतीने टोलमुक्त राज्याचे जे आश्‍वासन दिले होते त्याचे काय झाले? अशा प्रकारची आश्‍वासने केवळ द्यायची हे काही नवीन नाही. मात्र त्याची अमंलबजावणी हे पक्ष करतील अशी जनतेची अपेक्षा होती. परंतु त्यांनी अपेक्षांचा भंग केला आहे. टोल रद्द होण्याचे सोडून द्या आता टोल तर भरमसाठ वाढविण्यात आला आहे. याविरोधात जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी.
-------------------------------------------------------------

0 Response to "टोलचा एक्स्प्रेस दर "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel