-->
लोकसंख्यावाढीचा भस्मासूर

लोकसंख्यावाढीचा भस्मासूर

शुक्रवार दि. 07 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
लोकसंख्यावाढीचा भस्मासूर
जगातील लोकंसख्या वाढीचा भस्मासूर हे एक मोठे आगामी काळातील आव्हान ठरणार आहे. आपल्याकडे आपण यापूर्वीच 120 कोटीची लोकसंख्या ओलांडली आहे. भविष्यात आपम जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीचने गेल्या तीन दशकात सक्तीने संततीनियोजन करुन लोकंसख्येला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले मात्र एकाच मुलाच्या नियमामुळे जे सामाजिक प्रश्‍न निर्माण झाले त्यातून सोडवणूक करण्यासाठी चीनलाही दोन मुलांसाठी परवानगी द्यावी लागली. सध्याचे उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याअगोदर जी बेताल विधाने केली होती त्यातील त्यांचे लोकंसख्येवरील एक विधान होते, हिंदूनी प्रत्येकी दहा मुले काढावी. कारण मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे व त्याचा धोका आहे. अर्थात आता मुक्यमंत्री झाल्यावर तरी आदित्यनाथ यांनी या विधानाचा सुदैवाने पुनरुरच्चार केलेला नाही. मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत सध्या दुसर्‍या क्रमांकावर असलेला भारत 2050 मध्ये इंडोनेशियाला मागे टाकत पहिल्या स्थानावर असेल असे भाकित प्यू रिसर्च या जागतिक संस्थेने केले आहे. जागतिक स्तरावर सध्या ख्रिश्‍चनांची संख्या सर्वाधिक असून मुस्लीम दुसर्‍या स्थानावर आहेत. मात्र, मुस्लीमांचा जननदर ख्रिश्‍चनांपेक्षा जास्त असून 2055 ते 2060 च्या सुमारास मुस्लीम लोकसंख्या ख्रिश्‍चनांबरोबर होईल असा अंदाजही व्यक्त केला आहे. येत्या 20 वर्षांमध्ये ख्रिश्‍चनांच्या पोटी जन्माला येणार्‍या मुलांपेक्षा मुस्लीमांच्या पोटी जन्माला येणार्‍या मुलांची संख्याही जास्त असेल. प्यू रिसर्च सेंटर डेमॉग्राफीच्या अंदाजानुसार 2030 ते 2035 या कालावधीत जन्माला येणार्‍या मुस्लीमांची संख्या 22.5 कोटी असेल तर याच कालावधीत जन्माला येणार्‍या ख्रिश्‍चनांची संख्या 22.4 कोटी असेल. अर्थात, या कालावधीत एकूण ख्रिश्‍चनांची संख्या जरी जास्त राहणार असली तरी पुढील 20 ते 25 वर्षात मुस्लीम लोकसंख्या ख्रिश्‍चनांना मागे टाकेल असा अंदाज आहे. 2055 ते 2060 या कालावधीत मुस्लीमांच्या पोटी जन्माला येणार्‍या मुलांची संख्या 23.2 कोटी असेल तर ख्रिश्‍चनांची संख्या 22.6 कोटी असेल. 2010 ते 2015 या कालावधीत जगात जन्माला आलेल्या मुलांमध्ये मुस्लीमांचा वाटा 31 टक्के आहे, तर जागतिक लोकसंख्येतील मुस्लीमांचा वाटा 24 टक्के आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जननदर असल्यामुळे आणि ख्रिश्‍चनांमध्ये जननदर कमी असल्यामुळे दोघांमधला फरक हळूहळू कमी होईल आणि 2060 च्या सुमारास दोघांची संख्या समसमान असेल असा हा अंदाज आहे. जागतिक स्तरावरील हा कल भारतामध्येही प्रतिबिंबीत होत आहे. सध्या मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशिया प्रथमस्थानी आहे, मात्र 2050 मध्ये भारत मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशियाला मागे सारत प्रथमस्थानी येईल असे भाकित आहे. भारतातील हिंदूंची लोकंसख्या वाढत असली तरी तिची गती खुंटली आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शिक्षणाचा झालेला प्रसार. ख्रिश्‍चनांमध्ये देखील लोकसंख्या कमी होण्याचे हेच कारण आहे. मात्र यात आपवाद मुस्लिमांचा आहे. मात्र सुशिक्षित मुस्लिमंमध्ये एक किंवा दोनच मुले असतात. यावरुन धर्माच्या आधारावर लोकसंख्या विचार करताना केवळ एकाच धर्माला दोष देण्यापेक्षा त्यांच्यातील शैक्षणिक अभावाचा विचार झाला पाहिजे.

0 Response to "लोकसंख्यावाढीचा भस्मासूर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel