-->
नक्षलवाद: हिसांचार व वास्तव

नक्षलवाद: हिसांचार व वास्तव

रविवार दि. 30 एप्रिल 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
नक्षलवाद: हिसांचार व वास्तव
--------------------------------------
एन्ट्रो- सरकारने नक्षलवाद्यांचा बिमोड करताना केवळ लष्करी कारवाई नक्षलवाद्यांच्या विरोधात पुरेशी नाही, तर त्यांच्या विरोधात राजकीय लढाई लढावी लागणार आहे. जंगलातील आदिवासींचा विश्‍वास नक्षवाद्यांनी संपादन केला आहे तसा विश्‍वास सरकारी यंत्रणेला संपादन करावा लागेल. हा हल्ला केल्यानंतर नक्षलवाद्यांना वाचवायला तेथील आदिवासी पुढेे आले. त्यांनी केलेल्या संरक्षक भिंतीमुळे नक्षलवादी पसार होऊ शकले. तसेच त्यांनी पोलिसांकडील शस्त्रे व दारुगोळा हिसकावून घेण्यात यश मिळविले आहे. म्हणजे, त्यांच्याकडे आता दारुगोळ्याचा मोठा साठा जमा झाला आहे. याचा ते कधीही वापर करु शकतात. नक्षलवाद हा बंदुकीच्या गोळीने संपविता येणार नाही, त्यासाठी त्यांचा राजकीय मुकाबला करावा लागेल. कॉग्रेसलाही ते यापूर्वी सत्तेत असताना काही शक्य झाले नाही व रा.स्व. संघालाही म्हणजे भाजपाला ते काही शक्य होईल असे सध्यातरी दिसत नाही. नक्षलवादाच्या विरोधातली लढाई ही राजकीय आहे, व ती तशीच लढली गेली पाहिजे, हे सरकारला समजले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आदिवासींचा विश्‍वास संपादन करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या सरकारला हे जमेल का? हा सवाल आहे...
-------------------------------------------- 
नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर 300 नक्षलवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह 25 जवान शहीद झाले. सहा जवान अत्यवस्थ आहेत. छत्तीसगढ येथील सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरणे स्वाभाविकच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासूनचा नक्षलवाद्यांनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. नक्षलवाद्यांचे हे कृत्य निषेधार्थ आहे. कारण कोणत्याही हिंसेचे समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यानुसार याचा संपूर्ण देशातून निषेध होत आहे. नक्षलवाद्यांचे हे हल्ले काही नवीन नाहीत. मात्र अशा प्रकारे 25 जवान एकाच वेळी शहीद होण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना म्हटली पाहिजे. सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दुपारी गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबाार केला. सुरक्षा पथकानेही पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्‍चक्री उडाली. यात काही नक्षलवादीही मरण पावले आहेत. मात्र मेलेल्यांचे मृतदेहही त्यांच्या सहकार्‍यांनी जंगलात नेले. त्यामुळे राखीव पोलीस दलाच्या हाताला फारसे काही लागले नाही. जवानांच्या सांगण्यानुसार, नक्षलवाद्यांनी आदिवासींना समोर ठेवले व त्यांची छाल केल्याने ते पसार होण्यात यसस्वी झाले. तसेच पसार होताना ते पोलीस दलातील दारुगोळा न शस्त्रे घेऊन पसार झाले आहेत. खरे तर येथे रस्ता तयार करण्याचे काम सुरु आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी राखील पोलीस दलाचे संरक्षण देण्यात आले होते आणि त्याच जवानांवर हल्ला झाला. बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला. जवळपास तीन तास भीषण चकमक सुरू होती. हल्लेखोरांना पकडण्यासाठी या भागात अजूनही शोधमोहीम जोरात सुरू करण्यात आली आहेे. मात्र कुणीही हाती लागलेले नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच, दिल्लीचा दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री रमन सिंह हे तातडीने रायपूरकडे रवाना झाले. बस्तर विभागातील कालापाथर नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. यानंतर लगेचच कोब्रा कमांडोज आणि इतर पथकासह घटनास्थळी जवानांचा अतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला. दंतेवाडास्थित अरनपूर पोलीस ठाण्यासातील कोंडपारा भागातील शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाना एक दहा किलोचा बॉम्ब आढळला. सुरक्षा दलाने तो तातडीने निकामी केल्याने आणखी एक मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे. राज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्तीसगढला पोहोचलेे. हा हल्ला आम्ही आव्हानच समजतो, ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रायपूर येथे उपचारासाठी आणण्यात आलेला जवान शेर मोहम्मद याने सांगितले की, आम्ही बंदोबस्तावर असताना 300 नक्षलवाद्यांनी आमच्या गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांत दोन महिलांही होत्या. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. नक्षलवाद्यांनी आधी जवानांच्या मागावर गावकर्‍यांना पाठवून, त्यांचा नेमका ठावठिकाणा घेतला. नक्षलवाद्यांनी रस्ते करण्याला यातून विरोध केल्याचे स्पष्ट दिसते. नक्षलवाद्यांना रस्ते नको आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे, त्यांना विकास नको आहे. कारण विकास झाला तर जंगलातील आदिवासी लोक सुशिक्षित होतील व मग नक्षलवाद्यांचे महत्व राहाणार नाही, ही नक्षलवाद्यांना मुख्य भीती आहे. याच भीतीपोटी त्यांनी हा हल्ला केला आहे. वरील सर्व घटनाक्रम लक्षात घेता एक बाब स्पष्ट जाणवते की, आदिवासी हे नक्षलवाद्यांच्या बाजूने आहेत आणि सरकारच्या बाजूने नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांचा सरकारपेक्षा नक्षलवाद्यांवर विश्‍वास जास्त आहे. त्यामुळे सरकारने नक्षलवाद्यांचा बिमोड करताना केवळ लष्करी कारवाई नक्षलवाद्यांच्या विरोधात पुरेशी नाही, तर त्यांच्या विरोधात राजकीय लढाई लढावी लागणार आहे. जंगलातील आदिवासींचा विश्‍वास नक्षवाद्यांनी संपादन केला आहे तसा विश्‍वास सरकारी यंत्रणेला संपादन करावा लागेल. हा हल्ला केल्यानंतर नक्षलवाद्यांना वाचवायला तेथील आदिवासी पुढेे आले. त्यांनी केलेल्या संरक्षक भिंतीमुळे नक्षलवादी पसार होऊ शकले. तसेच त्यांनी पोलिसांकडील शस्त्रे व दारुगोळा हिसकावून घेण्यात यश मिळविले आहे. म्हणजे, त्यांच्याकडे आता दारुगोळ्याचा मोठा साठा जमा झाला आहे. याचा ते कधीही वापर करु शकतात. नक्षलवाद्यांची मुळे आता तळागाळात पोहोचली आहेत. आदिवासी जनतेचा नक्षलवाद्यांनी विश्‍वास कमविला आहे. राष्ट्रीय स्वय्ंसेवक संघाचे काम अनेक आदिवासी भागात वर्षानुवर्षे सुरु आहे. मात्र नक्षली भागात आदिवासी नक्षलवाद्यांची साथ सोडून संघाच्या मागे उभेे राहिल्याचे चित्र आपल्याला अजून काही दिसत नाही. भाजपाने गेल्या दोन वर्षात अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपल्या तेते राजकीय शिरकाव केला असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते. मात्र नक्षली भागात असे चित्र काही दिसत नाही. नक्षलवाद हे बंदुकीच्या गोळीने संपविता येणार नाही, त्यासाठी त्यांचा राजकीय मुकाबला करावा लागेल. कॉग्रेसलाही ते यापूर्वी सत्तेत असताना काही शक्य झाले नाही व संघालाही म्हणजे भाजपाला ते काही शक्य होईल असे सध्यातरी दिसत नाही. नक्षलवादाच्या विरोधातली लढाई ही राजकीय आहे, व ती तशीच लढली गेली पाहिजे, हे सरकारला समजले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आदिवासींचा विश्‍वास संपादन करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या सरकारला हे जमेल का? हा सवाल आहे. त्यांची तशी राजकीय इच्छाशक्ती आहे का? नक्षलवाद केवळ बंदुकीच्या गोळीने नव्हे तर राजकीय दृष्टया त्याचा सामना करण्याची कुवत या सरकारमध्ये आहे का? या सवालांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत नक्षलवाद अशाच प्रकारे उफाळून येत राहाणार.
----------------------------------------------------

0 Response to "नक्षलवाद: हिसांचार व वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel