-->
रायगडाची नवी ओळख

रायगडाची नवी ओळख

मंगळवार दि. 18 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
रायगडाची नवी ओळख
एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा रायगड आता आपली ओळख हरवून बसला आहे. जिल्ह्यतील शेती क्षेत्रात झपाट्याने घट होत असून याची जागा औग्योगिक क्षेत्र घेत आहे. मुंबईपासून जवळ असल्यामुळे येथील जमिनींचा औग्योगिकीरकरणासाठी मोठा वापर 80च्या दशकापासून सुरु झाला होता. मात्र अंबांनींच्या सेझला येथील शेतकर्‍यांनी कडाडून विरोध केल्याने येथील औद्योगिकीकरणाला थोडा फार आळा बसला होता. आता मात्र पुन्हा एकदा येथे अनेक कंपन्या आपले प्रकल्प थाटण्यासाठी योजना आखीत आहेत. तसेच येथे नियोजित असलेल्या आन्तरराष्ट्रीय विमानतळासाठी दोन हजार हेक्टर जागा लागणार असल्याने पनवेलजवळची मोक्याची जागा शेतकर्‍यांच्या हातून गेली आहे. त्यापेक्षाही या विमानतळामुळे केवळ येथीलच नव्हे तर या परिसरातील किमान 200 कि.मी परिसारातील विकास झपाट्याने होणार आहे. मागील चार वर्षांत सुमारे सात हजार हेक्टर शेती क्षेत्रात घट झाली आहे. सध्या जिल्ह्यात एक लाख 34 हजार हेक्टर क्षेत्रावर शेती करण्यात येत आहे. चार वर्षांपूर्वी एक लाख 41 हजार हेक्टर क्षेत्रावर शेती करण्यात येत होती. तसेच सध्या नवी मुंबई विमानतळ, साबरकुंड धरण प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच करंजा टर्मिनल व रेवस आवरे पोर्ट यासह इतर प्रकल्पांसाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. यामुळे पुढील काळात आणखी शेती क्षेत्रात घट होणार आहे. मुंबईपासून जवळ असणार्‍या रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचे जोरदार वारे आता पुन्हा वाहू लागले आहेत. औद्योगिक प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील हजारो हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील जमिनींचे दर गगनाला भिडल्याने, शेतकरी या प्रलोभनाला भुलून आपली शेती विकू लागले आहेत. परिणामी नजिकच्या काळात भाताचे कोठार ही रायगड जिल्ह्याची ओळख पुसली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माागील चार वर्षांत 7 हजार हेक्टरने शेतीच्या क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्यतील अलिबाग, पेण, खालापूर, पनवेल, उरण, रोहा, महाड, माणगाव, श्रीवर्धन तालुके सध्या औद्योगिक विकासाचा केद्रबिंदू ठरत आहेत. एकामागून एक महाकाय औद्योगिक प्रकल्प या परिसरात दाखल होत आहेत. तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात भूसंपादन सुरू आहे. या सर्व प्रकल्पांसाठी करण्यात येणार्‍या भूसंपादनात शेतीचे मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले जाणार आहे. तसेच मुंबईतील लोकांसाठी रायगड जिल्ह्यातील अनेक भागात गृहर्निमाणचे प्रकल्प उभे राहात आहेत. मुंबई व पुणेकरासाठी सेकंड होम म्हणून हा एक चांगला पर्याय ठरत आहे. मात्र यातील सर्वात दुदैवाची बाब म्हणजे यात शेतकर्‍यांच्या हातची जमीन आता हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे. उरणसारख्या भागात जे.एन.पी.टी. बंदर जवळ असल्याने कंटेनरचे मोठे यार्ड उभे राहात आहेत. त्यामुळे शेती करण्यापेक्षा जमीनी विकून पैसा उभारण्यात शेतकर्‍यांना विशेष रस आहे. अर्थात हा शेतकरी आलेला पैसा काही जपून ठेवत नाही गुंतवणूक करण्याअगोदरच त्याच्या हातातून आलेला पैसा कधी खर्च होतो तेच त्याला समजत नाही. परिणामी हा शेतकरी पुन्हा बेघर होत आहे. यातून त्याची व्यसनाधिनता वाढते आहे. त्यामुळे या शेतकर्‍याला तेथून जवळच असणार्‍या एखाद्या औद्योगिक वसाहतीतील कंपनीत काम करण्याची पाळी येत आहे. हा शेतकरी आपली वडिलोपार्जित शेती विकून खाऊ लागल्यामुळे या परिसरात अनेक मासाजिक व आर्थिक प्रश्‍न उभे राहिले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपली जमीन विकताना हजार वेळा विचार केला पाहिजे.

0 Response to "रायगडाची नवी ओळख"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel