-->
दाऊदची पक्कड ढीली?

दाऊदची पक्कड ढीली?

शुक्रवार दि. 31 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
दाऊदची पक्कड ढीली?
नवी दिल्लीच्या विमानतळावरुन मंगळवारी एका केनियाहून आलेल्या 24 वर्षीय महिलेस मादक पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली व तिच्याकडून करोडो रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. अर्थात गेल्या काही दिवसात आफ्रिकेहून आलेल्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर मादक पदार्थ पकडले गेले आहेत. आजवर मुंबईत या उद्योगावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा वरचश्मा होता. दाऊद विदेशात राहून येथील आपल्या सर्व टोळीच्या मार्फत सर्व सुत्रे हलवित होता. परंतु आता या उद्योगावरील  दाऊदची पकड ढिली होत चालली आहे आणि आता आफ्रिकन ड्रग्ज माफियांनी ही जागा काबीज केली आहे. यापूर्वी दाऊद याचा आफ्रिकन नागरिकांना सोबत घेऊन हा धंदा करीत असे. मात्र आता परिस्थीती बदलली असून दाऊदकडे कामाला असणारी हीच माणसे स्वतंत्र्यरित्या ही कामे करीत आहे. सध्या आपल्या देशात आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे मादक पदार्थ अवैध मार्गांनी आणले जातात. याच्या वाहतुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे मादक पदार्थ लपवून आणण्यासाठी अनेक युक्त्या लढविल्या जातात. अलिकडे मुंबई विमानतळावर कंडोममधून काही मादक पदार्थ आणले जात असल्याचे आढळले होते. त्यामुळे गुन्हेगार या पदार्थाच्या आयातीसाठी नवनवीन कल्पना लढवित असल्याचे पोलिसांना आढळले आहे. दाऊदची मुंबई मादक पदार्थांच्या बाजारपेठेवरील पक्कड आता सैल झालेली असल्यामुळे खून्नसपोटी दाऊदचीच मंडळी आता पोलिसांना आफ्रिकेतील येणार्‍या आमली पदार्थांची टिप्स देत आहेत, अशी एक चर्चा आहे. दाऊद खरोखरीच टीप्स देतो किंवा नाही मात्र गेल्या काही काळात मादक पदार्थांची तस्करी पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे, ही बाब स्वागतार्ह ठरावी.
------------------------------------------------------------------------

0 Response to "दाऊदची पक्कड ढीली?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel