-->
कोकणात उद्योगाची मुद्रा यशस्वी

कोकणात उद्योगाची मुद्रा यशस्वी

सोमवार दि. 27 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
कोकणात उद्योगाची मुद्रा यशस्वी
ग्रामीण भागातील लोकांना लहान उद्योगधंदे करुन आपला उर्दरनिर्वाह करता यावा यासाठी केंद्राने आखलेल्या मुद्रा योजनेला कोकणातून उत्कृष्ट प्रतिसाद लाभला असून जास्ती जास्त लोक या योजनेत सहभागी होण्यासाठी पुढे आले आहेत, असे सध्या तरी चित्र आहे. यापूर्वी कोकण म्हटले म्हणजे घरातून एकाचा तरी रोजगार हा मुंबईत असायचा व त्याच्याकडून पैसे आल्यावर प्रामुख्याने तळ कोकणातील चुली पेटायच्या. मात्र आता हे चित्र झपाट्याने बदलत चालले आहे. मुंबईतील रोजगारावर अनेक मर्यादा आल्या आहेत त्यामुळे आपल्याला मुंबईत जाऊन रोजगार मिळविण्यापेक्षा आपल्या गावात किंवा गावापासून जवळ असलेल्या लहान शहरात राहून काही ना काही तरी स्वयंरोजगार करण्याकडे कल वाढत चालला आहे. अशांसाठी मुद्रा योजना अतिशय महत्वाची होती. कोकणातील चार जिल्हात या योजनेअतंर्गत तरुणांना सुमारे एक हजार कोटी वाटण्यात आले आहेत. विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून या कर्जांचे वाटप करण्यात येते. या योजनेत शिशु कर्ज, किशोर कर्ज व तरुण कर्ज असे तीन प्रकार आहेत. शिशु कर्जात 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, किशोरांसाठी 50 हजार ते 5 लाखांपर्यंत व तरुण कर्ज योजनेत 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. या तीन कर्जावर आकर्षक व्याज दर आकारण्यात येतो व महत्वोच म्हणजे कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. या योजनेत दिलेले हे मुद्राकार्ड मुख्यत: कृषि क्षेत्राच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतु नुकतेच कृषि क्षेत्राला पूरक असणार्‍या व्यवसायासाठीही या अंतर्गत कर्ज मिळते. छोटे व्यवसाय उदा. भाजीपाला विक्री करणारे, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीन टाकणे, खाणवळ, स्वत:चे ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थ विक्री करणारी गाडी टाकणे, पोल्ट्री फार्म, सेवा देणारा उद्योग अशा प्रकारच्या कुठलाही लघुउद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेची मूळ संकल्पना मायक्रो फायनान्सच्या धर्तीवर आहे. मायक्रो फायनान्समुळे लघु उद्योजकांना चालना मिळून छोटे छोटे व्यवसाय करणार्‍या व्यक्ती आर्थिकदृष्टया सक्षम होता येते. या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये लघु उद्योजकांना आपले योगदान देता येणार आहे. कोकणातील तरुणांनी यात पुढाकार गेऊन कर्जे घेण्याचा केलेला हा प्रयत्न म्हणजे कोकणी माणसाची उद्योगधंद्याबाबत बदलत चाललेली मानसिकता स्पष्टपणे दाखविते. कोकणातील हा बदल लक्षणीय म्हटला पाहिजे.
---------------------------------------------------

0 Response to "कोकणात उद्योगाची मुद्रा यशस्वी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel