-->
मोदी लाट आता शेअर बाजारातही

मोदी लाट आता शेअर बाजारातही

गुरुवार दि. 16 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
मोदी लाट आता शेअर बाजारातही
उत्तर प्रदेशात भाजपाची आलेली मोदी लाट आता थेट शेअर बाजारात पोहोचली असून शेअर निर्देशांक सेन्सेक्स दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 152.45 अंकांनी वाढून 9,087 अंकांवर बंद झाला. 3 मार्च 2015 रोजी निफ्टी 8,996.25 अंकांवर बंद झाला होता. आता निफ्टी प्रथमच 9 हजार अंकांच्या वर बंद झाला आहे. नेहमी घाऊक आणि किरकोळ महागाईच्या आकडेवारीमुळे चढ-उताराच्या हिंदोळ्यावर राहणारा शेअर बाजार मोदी लाटेमुळे मात्र घाऊक महागाई वाढल्याच्या आकडेवारीने बिथरला नाही. महागाई 6.55 टक्क्यांवर आली असली तरीही शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला नाही.
आयसीआयसीआय बँकेपाठोपाठ हिंदुस्तान युनिलिव्हर, एलअ‍ॅण्डटी, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी आणि अदानी पोर्ट्स आदी कंपन्यांचीही या तेजीत चलती होती. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाच्या लाटेमुळे गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातील विश्‍वास वाढला. देशात आता स्थिर सरकार स्थापन झाले आहे तसेच उत्तरप्रदेशातील भाजपाच्या विजयामुळे केंद्रातील सरकार अधिकच स्थिरावले आहे. अमेरिकेतील काही सल्लागारांच्या मते 2019 सालची निवडणूक भाजपासाठी अतिशय सोपी जाणार आहे. मात्र 2019 सालापर्यंत दोन वर्षात अनेक राजकीय घडामोडी होऊ शकतात, त्यामुळे याविषयी आत्ताच भविष्यवामी करणे चुकीचे ठरेल. बँकांतून पैसे काढण्यावरील मर्यादा हटवण्यात आली आहे, त्यामुळे आता खरेदी वाढेल आणि बाजारात पुन्हा पहिल्यासारखाच पैसा खेळेल अशी आशा आहे. केवळ शेअर बाजारातच नव्हे तर चलन बाजारातही तेजी आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्ये 11 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदार संस्थांना भारतीय गुंतवणुकीतील विश्‍वास वाढला. घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर फेब्रुवारीत 6.55 टक्क्यांवर पोहोचला असून, हा 39 महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. खाद्यवस्तूंच्या किमती वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जानेवारीत 5.25 टक्के होता. आता फेब्रुवारीत खाद्याच्या किमतींत 2.69 टक्क्यांची वाढ झाली आहे. आदल्या महिन्यात ती 0.56 टक्क्यांवर होती. अन्नधान्ये, तांदूळ आणि फळे यांच्या किमती वाढल्यामुळे निर्देशांक वाढला आहे. इंधनाचे दरही या काळात 21.02 टक्क्यांनी वाढले. आदल्या महिन्यात ही वाढ 18.14 टक्के होती. डिसेंबरमधील महागाईच्या दराचे आकडे सरकार 3.39 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र याची फिकीर शेअर बाजाराला नाही. सध्याच्या मोदी लाटेवर हा शेअर बाजार आता स्वार झाला आहे. मोदींच्या राहिलेल्या दोन वर्षाच्या काळात आता शेअर बाजार एक नवा उच्चांक स्थापन करील असा विश्‍वास आता शेअर दलालांना वाटतो. शेअर बाजार हा भविष्यातील अपेक्षित चांगले वातावरण लक्षात घेऊन तेजीत येतो. सध्या याचाच भाग म्हणून तेजी आली आहे. बाजारातील तेजीमुळे देशात गुंतवणूक वाढण्यास मदत होते का, तसेच विदेशी गुंतवणूक कितपत येते याकडे पाहणे महत्वाचे आहे.

0 Response to "मोदी लाट आता शेअर बाजारातही"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel