-->
उन्हाचे वाढते चटके

उन्हाचे वाढते चटके

संपादकीय पान मंगळवार दि. 28 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
उन्हाचे वाढते चटके
आपल्याकडे सहसा होळी झाल्यावर उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र यंदा होळ्याच्या अगोदर पंधरा दिवसच उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. वातावरणातील कोरड्या हवामानामुळे उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. भिरा येथे सर्वाधिक 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबई, जळगाव, रत्नागिरी वगळता उर्वरित प्रमुख शहरांचा पाराही 35 अंशांच्या वर गेला आहे. गेल्या चोवीस तासांत हवामान कोरडे होते. उद्या मंगळवार पर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. पुणे 36.7, जळगाव 34.4, कोल्हापूर 36.9, महाबळेश्‍वर 33.0, मालेगाव 36.8, नाशिक 34.0, सांगली 38.4, सातारा 36.1, सोलापूर 38.1, सांताक्रूझ 33.7, अलिबाग 30.0, भिरा 40.5, रत्नागिरी 33.5, डहाणू 29.6, औरंगाबाद 36.0, परभणी 36.9, अकोला 35.5, अमरावती 34.6, बुलडाणा 32.7, नांदेड 37.0, गोंदिया 34.0, नागपूर 35.9, वर्धा 36.1, यवतमाळ 35.0 या राज्यातील प्रमुख शहरातील उन्हाचा पारा ज्या गतीने गेल्या आठवड्यात चढलेला पाहता ही स्थीती चिंताजनकच म्हटली पाहिजे. गेल्या काही वर्षात कोणतेही हवामान टोकाचे होत आहे. यामागे निसर्गाचे ढासळत चाललेला तोल कारणीभूत आहे. माणसाने आपल्या निसर्गाने दिलेली साधनसंपत्ती लुटण्यास सुरुवात केल्याने सर्वच तोल ढासळू लागला आहे. सध्या जाणवणारे उन्हाचे टचकेहा त्याचाच भाग ठरावा.
------------------------------------------------------------

0 Response to "उन्हाचे वाढते चटके"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel