-->
रविवार दि. 19 मार्च 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
उत्तरप्रदेशातील निकालाचा अर्थ
--------------------------------------------
एन्ट्रो- निवडणुकीचे निकाल पाहता बिगरयादव ओबीसी समाज हा मोदींच्या बाजूने उभा राहिला. भाजपमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर असा संघर्ष सुरू आहे. मोदी हे ब्राह्मणेत्तरांचे नेतृत्व करीत आहेत. मोदींचा ओबीसी चेहरा बहुजन समाजाने स्वीकारला. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले. कॉग्रेसला असे वाटले की एकेकाळी भाजपाला विजयाच्या दारात नेणारे तसेच बिहारमधील नितीश-लालू यांचा प्रयोग यशस्वी करणारे प्रशांत किशोर यांना आपण आपल्या कंपूत घेेतले की विजय आपलाच आहे. मात्र असा प्रकारे केवळ प्रशांत किशोर हे विजयश्री खेचून देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांच्या पाठीशी जसे विविध डावपेच आखत पक्ष संघटना राबवावी लागते. कॉग्रेस उत्तरप्रदेशात अतिशय दुबळी झाली आहे. ज्या पक्षाला एकेकाळी तेथील ब्राह्मण, दलित, मुस्लिम एकगठ्ठा मते मिळत होती व या मतांची मक्तेदारी आपलीच आहे असे त्यांना वाटत होते, त्यातील बहुतांशी मते आता भाजपाच्या पदरात पडली आहेत. दलित-ब्राह्मण-मुस्लिम यांची मोट बांधून एकदा यशस्वी झालेल्य मायावतीही यवेळी का प्रभावहीन झाल्या, असा सवाल उपस्थित होतो. यामगचे एक महत्वाचे कारण म्हणजे लोकांना यावेळी बदल पाहिजे होता व समाजवादी पक्ष, कॉग्रेस किंवा बहुजन समाज पक्ष यांच्यापेक्षा कोणीतरी आपल्याला वेगळा पक्ष पाहिजे असे वाटत होते...
---------------------------------------------------------
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशाचे निकाल भाजपाच्या बाजूने लागले आणि विरोधकांना अनपेक्षित असे धक्के बसले. अर्थात तसे धक्के बसणे स्वाभाविकच होते. भाजपाने आखलेली रणणिती पूर्णपणे यशस्वी ठरली. निवडणुका जिंकणे हे एक तंत्र आहे. यापूर्वी कॉग्रेसला ते फार यशस्वीरित्या जमले होते. आता त्या पावलावर पावले ठेवून भाजपाने यात बाजी मारली असेच म्हणता येईल. उत्तरप्रदेशमध्ये जेवढी जातीची समीकरणे प्रभावी ठरतात त्याचप्रमाणे तेथील प्रश्‍न देखील आक्रमकपणेे मांडणे गरजेचे हाते. मोदींनी हेच नेमके केले. जनतेच्या मनातील नस त्यांनी अगदी जोखली आणि आपले प्रचारतंत्र अवलंबिले. कॉग्रेसला असे वाटले की एकेकाळी भाजपाला विजयाच्या दारात नेणारे तसेच बिहारमधील नितीश-लालू यांचा प्रयोग यशस्वी करणारे प्रशांत किशोर यांना आपण आपल्या कंपत गेतले की विजय आपलाच आहे. मात्र असा प्रकारे केवळ प्रसांत किशोर हे विजयश्री खेचून देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांच्या पाठीशी जसे विविध डावपेच आखत पक्ष संघटना राबवावी लागते. कॉग्रेस उत्तरप्रदेशात अतिशय दुबळी झाली आहे. ज्या पक्षाला एकेकाळी तेथील ब्राह्मण, दलित, मुस्लिम एकगठ्ठा मते मिळत होती व या मतांची मक्तेदारी आपलीच आहे असे त्यांना वाटत होते, त्यातील बहुतांशी मते आता भाजपाच्या पदरात पडली आहेत. दलित-ब्राह्मण-मुस्लिम यांची मोट बांधून एकदा यशस्वी झालेल्य मायावतीही यवेळी का प्रभावहीन झाल्या, असा सवाल उपस्थित होतो. यामगचे एक महत्वाचे कारण म्हणजे लोकांना यावेळी बदल पाहिजे होता व समाजवादी पक्ष, कॉग्रेस किंवा बहुजन समाज पक्ष यांच्यापेक्षा कोणीतरी आपल्याला वेगळा पक्ष पाहिजे असे वाटत होते. कारण गेल्या 15 वर्षात त्यांनी या सर्वांनाच सत्तेत वाटेकरी करुन फारसे काही हत नाही हे पाहिले होते. अर्तात पंधरा वर्षापूर्वी भाजपाही येथे सत्तेत होता. त्यावेळी श्रीरामाचा जप करुन त्यांनी सत्ता काबीज केली होती. त्यांनी फारसे काही न केल्याने त्यांनाही जनतेने घरी बसविले. आता पुन्हा त्यांना संधी दिली आहे. मात्र यावेळी त्यांना विकासाच्या मुद्यावर सत्तेत बसविले आहे, हे विसरता कामा नये. समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची लोकप्रियता कायम होती मात्र त्यांना ती मते मिळविण्यास मदतकारक ठरली नाहीत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली. दलित-ओबीसींच्या जनाधारावर उत्तर प्रदेशाच्या राजकारणावर मक्तेदारी सांगणार्‍या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह आणि मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे नेतृत्व पराभूत झाले. भाजपने गेल्या वर्षां-दोन वर्षांपासून दलित व ओबीसींना आपलेसे करण्यास आखलेल्या रणनीतीला यश मिळाले. उत्तर प्रदेशातील राजकारण हे विकासाच्या मुद्दयां बरोबरच जातींच्या अस्मितेभोवती फिरणारे आहे. त्यानुसार जातींच्या ध्रुवीकरणातून सत्ता हस्तगत करण्याचे राजकारण यशस्वी होते, असा आजवरचा इतिहास आहे. बसपचे संस्थापक कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात फुले-शाहू-आंबेडकरांचा नारा देऊन बहुजनवादी राजकारणाची महूर्तमेढ रोवली. मायावती व मुलायमसिंह किंवा अखिलेश यादव यांची जातीय समीकरणे विस्कटून ती आपल्याकडे वळविण्यात भाजपची खेळी यशस्वी झाली. दलितांमधील लहान जातींना एकत्र करून कांशीराम यांनी बसपची उभारणी केली. आज तेथे दलितांची 21 टक्के लोकसंख्या आहे, परंतु मायावती यांना ती मतपेढी टिकविता आली नाही. यावेळी तर बसपाने 100 हून जास्त जागा मुस्लिमांसाठी सोडल्या होत्या. मात्र हा मायावतींचा प्रयोग पूर्णपणे फसला. आता याच मायावती मतदान यंत्रातील घोटाळ्यांमुळे भाजपाचा विजय झाला असे म्हणत आहेत. परंतु हे आरोप म्हणजे पराभवानंतरचे आलेली उद्दीगनता आहे. उत्तर प्रदेशात दलित-ओबीसींची यांची एकत्रित 51 टक्के लोकसंख्या आहे. दलित समाज हा बसपचा कट्टर मतदार आहे, अशी ठाम समजूत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नेत्यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्यामुळे दलित व ओबीसी समाज भाजपच्या विरोधात होता. दलित समाजाला आपलेसे करण्यासाठी भाजपने धम्म चेतना यात्रा काढली होती. बसपनेही दलित, मुस्लीम, ठाकूर, ब्राह्मण उमेदवार दिले असतानाही भाजपलाच एवढे मोठे यश कसे मिळाले, याचे विश्‍वेषण आता विरोधकांनी करण्याची वेळ आली आहे. भाजपाने राज्यातील प्रत्येक पक्षाच्या पारंपारिक मतदार पेढीला धक्का दिला. जनतेच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. लोकांना गृहीत धरुन कोणालाही चालता येणार नाही, असाच याचा अर्थ आहे. निवडणुकीचे निकाल पाहता बिगरयादव ओबीसी समाज हा मोदींच्या बाजूने उभा राहिला. भाजपमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर असा संघर्ष सुरू आहे. मोदी हे ब्राह्मणेत्तरांचे नेतृत्व करीत आहेत. मोदींचा ओबीसी चेहरा बहुजन समाजाने स्वीकारला. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले.
उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेश संघटनमंत्री सुनील बन्सल हे आहेत. उत्तरप्रदेशात अविश्‍वसनीय विजय नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपने मिळविला आहे, त्याचा पडद्यामागचा शिल्पकार सुनिल बन्सल असल्याचे बोलले जाते. 2014मध्ये शहांनी जशी केवळ अविश्‍वसनीय कामगिरी (लोकसभेच्या 80 पैकी 73 जागा) केली होती, तशीच 403पैकी 324 जागांची कामगिरी विधानसभेमध्ये करणार्‍या कोअर टीमममधील सर्वाधिक प्रभावी नाव बन्सल हे आहे. बन्सल हे मूळचे राजस्थानचे आहेत. अभाविपचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते. दिल्ली विद्यापीठामध्ये वारंवार हरणार्‍या विद्यार्थी परिषदेच्या विजयाचा सिलसिला सुरू करणारे बन्सल यांना शहांनी हेरले आणि आपल्यासोबत 2014च्या तयारीसाठी घेतले. पुढे शहा राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि मग उत्तर प्रदेशच्या रणनीती अंमलबजावणीची जबाबदारी बन्सल आणि राज्य प्रभारी ओम प्रकाश माथूर यांच्याकडे सोपविली गेली. गेली अडीच वर्षे माथूर आणि बन्सल ही जोडगोळी उत्तर प्रदेशात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती आणि त्याला जबरदस्त यश मिळाले. त्यांचे संघटनकौशल्य वादातीत आहे. वक्तृत्व प्रभावी आहे, पण जीभ बोचरी आहे. त्यांचे रोखठोक बोलणे अनेकांना डाचते, असे बोलले जाते. आज विजयाचे शिल्पकार म्हणून पक्षात त्यांचे वजन वाढले आहे. अर्थात केवळ एका व्यक्तीवर निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी पक्ष संघटनही मजबूत लागते. निवडणुकीची स्ट्रेटीजी लागते. त्यात भाजपा यसस्वी ठरला हे वास्तव कुणालाच नाकारता येणार नाही.
----------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel