-->
देशभक्तीचे उमाळे

देशभक्तीचे उमाळे

संपादकीय पान गुरुवार दि. 02 मार्च 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
देशभक्तीचे उमाळे
देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा देशभक्तीचे उमाळे अनेकांना येऊ लागले आहेत. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पुन्हा एकदा भाजपा प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व डाव्या संघटनांच्या विद्यार्थी संघटना परस्परविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. यापूर्वी जे.एन.यू. विद्यापीठात असेच प्रकरण पेटले होते व त्यातून विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत माजल पोहोचली होती. आता देखील काहीसा हाच मुद्दा उफाळून वर आला आहे. दिल्लीतील श्रीराम कॉलेजमध्ये शिकत असलेल्या गुरुमेहर कौर या विद्यार्थीनीने आपल्या वडिलांचया निधनाबद्दल एक पोस्ट टाकली होती. कौर हिचे वडिल कारगिल युध्दातील शहीद आहेत. मात्र तिच्या या पोस्टने देशभक्तीचे उमाळे येणारे लोक भडकले व त्यांनी तिच्या विरोधात जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. एका शहिदाच्या मुलीवर असा प्रकारे टाका टीपमी करणे चुकीचेच होते व एवढेच नव्हे तर तिच्यावर बलात्कार करण्याची धमकीही देण्यात आली. एकूणच यावरुन सोशल मिडिवर मोठे युद्द सुरु झाले. यात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपावर थेट निशाना साधला. विद्यार्थी संघटनांमध्ये सुरु झालेल्या या वादाने राजकीय रुप घेतले. नाही तर जे.एन.यु.तील विद्यार्थी संघटनेबाबत भाजपा नाराज आहेच. कारण गेल्यावेळी त्यांनी कन्हैयाकुमारला टार्गेट केले होते. मात्र तो डाव काही यशस्वी झाला नाही व जनता व विद्यार्थी कन्हैयाकुमारच्याच बाजुने आहेत हे सिद्द झाले. एवढेच नव्हे तर कन्हैयाकुमारवरील देशद्रोहाच्या आरोपाचे पुरावे अजून सादर करण्यात आलेले नाहीत. त्यावरुन सरकारचे हे छडयंत्र सिद्द होते. आता देखील कौर प्रकरणी शेवटी या मुलीनेच आपली बदनामी टाळावी यासाठी माघार घेण्याचे ठरविले व या प्रकरणावर पडदा पाडावा अशी तिची इच्छा आहे. मात्र हे प्रकरण तिच्याकडून शमले असले तरी लवकर मिटले जाणार नाही असेच दिसते. कारण सरकारला हे प्रकरण जिवंत ठेवायचे आहे.
-------------------------------------------------

0 Response to "देशभक्तीचे उमाळे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel