-->
संपादकीय पान बुधवार दि. ०४ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मुफ्तींची मुक्ताफळे
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होऊन दोन महिने झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स व भाजपाचे सरकार अखेर सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री म्हणून मुफ्ती मोहमंद सईद यांचा शपथविधी पार पडला आणि काश्मिरात आता एक नवे पर्व सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पहिल्याच दिवसांपासून मुख्यमंत्री मुफ्ती सईद यांनी जी मुक्ताफळे उधळण्यास सुरुवात केली आहे ते पाहता, सध्याचे सरकार किती काळ टिकेल व राज्यात कितपत शांतता नांदून विकासाचे पर्व सुरु होईल याबाबत शँका वाटू लागली आहे. नवनियुक्त मुक्यमंत्र्यांनी काश्मिरात झालेल्या शांततामय निवडणुकांचे श्रेय त्यांनी पाकिस्तान, हुरियत कॉन्फरन्स आणि काश्मिरातील दहशतवादी संघटनांना दिले आहे. सीमेपलीकडची व सीमेत राहून दहशती कारवाया करणारी ही माणसे शांत होती म्हणूनच ही निवडणूक नीट पार पडली असे सांगून त्यांनी देशाच्या निवडणूक यंत्रणेसह भारतीय लष्कराचा व जनतेचाही घोर अपमान केला आहे. गेली ६० वर्षे काश्मिरात निवडणुका झाल्या व त्या शांततेतच पार पडल्या. या निवडणुकांच्या यशाचे श्रेय निवडणूक यंत्रणेसह देशाच्या लष्कराला, सरकारला व जनतेला जाते. ते श्रेय पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांच्या पदरात घालून मुफ्तींनी काश्मीरचे नेतृत्व करायला लागणारे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही हेच उघड केले आहे. पीडीपीने यापूर्वी राज्यात सत्ता उपभोगली आहे. त्यामुळे या पक्षांना राज्यातल्या विविध प्रश्‍नांचे खाचखळगे ठाऊक आहेत. पाकिस्तानशी संबंध, हुरियतचा प्रश्‍न, आर्म्ड ङ्गोर्सेस स्पेशल पॉवर्स कायदा (अङ्गस्पा), कलम ३७० असे अनेक मुद्दे इथल्या जनतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहेत हे ते जाणून आहेत. राज्यात शांतता नांदायची असेल तर प्रत्येक बाबतीत काळजीपूर्वक पुढे जाणे आवश्यक आहे हे या पक्षाला पक्के ठाऊक आहे. सत्तेतला वाटेकरी असलेल्या भाजपा एकीकडे पक्षातील विविध मतप्रवाह आणि आग्रह, तर दुसरीकडे प्रत्यक्ष परिस्थितीची मागणी आणि व्यवहार्यता यांच्यात ते कसा समन्वय साधतील ते पहायचे. पाकिस्तान आणि हुरियत यांच्याशी चर्चा बंद करता येणार नाही असे पीडीपीचे म्हणणे आहे, पण त्याचबरोबर जम्मू या हिंदूबहुल विभागाचे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व नसलेले सरकार उपयोगाचे नाही याचीही जाण त्यांना आहे. त्यामुळेच भाजपाची समर्थ साथ त्यांना आवश्यक आहे. आज काश्मिरमध्ये शिक्षण, आरोग्य सेवा, विधवा-अर्धविधवा आणि अनाथ मुलांचे पुनर्वसन आणि तरूणांना रोजगाराच्या संधी या मूलभूत गोष्टींकडे तातडीने लक्ष पुरवण्याची गरज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आजही अनेक जिल्ह्यांमध्ये ङ्गक्त एक वा दोन महाविद्यालये आहेत. दहशतवादी कारवाया असोत, कर्फ्यु असो वा अलिकडेच आलेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत, यात मुले, महिला आणि गरीब सामान्य मनुष्य हेच घटक सर्वात जास्त होरपळतात. पण पाकिस्तान असो वा हुरियत, अङ्गस्पा असो वा कलम ३७०, या मुद्‌द्यांकडेच एवढे लक्ष द्यावे लागते वा दिले जाते की, सामान्य काश्मिरी माणूस, मग तो खोर्‍यात राहणारा मुसलमान असो की जम्मूच्या स्थलांतरितांच्या कँपमध्ये राहणारा हिंदू असो वा कारगिल-लेहसारख्या दुर्गम प्रदेशात राहणारा बौद्ध, दुर्लक्षितच राहतो. भरीस भर म्हणून धार्मिक ध्रुवीकरण, राज्याबाहेरील जनतेचा अविश्‍वास, समज आणि गैरसमज यामुळे या राज्यातला सामान्य माणूस मेटाकुटीला न आला असल्यासच नवल. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवण्याचा आग्रह धरायचा असेल, तर पाकव्याप्त काश्मीरमधला मोठा भाग त्या देशाने चीनला आंदण देण्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. लष्कराचे अधिकार मर्यादेत ठेवणे आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर परिसराच्या सुरक्षिततेची काळजीदेखील घेणे गरजेचे आहे. मुफ्ती मोहंमद सईद यांनी पीडीपी आणि भाजपा एक येणे ही एक ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटले आहे, मात्र वास्तव असे आहे की सत्तेसाठी आपल्या विचारांना गुंडाळून हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. सत्तेसाठी दोन धुवांवर असणारे पक्ष एकत्र येऊ शकतात हे भाजपा-पी.डी.पी.ने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मोदी काश्मिरी जनतेच्या जखमांवर ङ्गुंकर घालू शकतात आणि त्यासाठी ते ही संधी साधतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. वातावरण योग्य आहे, गरज आहे वादग्रस्त मुद्दे सामंजस्याने सोडवण्याची. ही संधी खरे तर संपूर्ण देशालाच आहे. काश्मिरींची मने जिंकण्याची, त्यांना आपलेसे करण्याची आणि त्यांना आपण या देशाचे आहोत आणि हा देश आपला आहे असे वाटायला लावण्याची. हे घडून आल्यास अनेक मुद्दे आपोआपच निकाली निघतील. यामुळे पाकिस्तानच्या छुप्या खेळ्यांना चपराक बसेलच पण देशाची काश्मीररूपी भळभळती जखम कायमची बरी होण्याकडे वाटचाल करेल हे नक्की. गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मिरमधील वातावरण पूर्वीच्या तुलनेत खूपच आशादायकरित्या शांत वातावरण आज या राज्यात दिसते आहे. आता तर नवीन सरकार स्थापन झाल्याने तिथली जनता हळूहळू गेल्या पंचवीस वर्षांपासूनच्या हिंसाचार, असुरक्षितता आणि दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडू शकावी, तिथे पुन्हा एकदा ङ्गूल खिले हैं गुलशन गुलशन अशी मनोहारी स्थिती निर्माण व्हावी हीच सदिच्छा!
-------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel