-->
संपादकीय पान सोमवार दि. २२ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
दहशतवादाची जागतिक लढाई
ऑस्ट्रेेलियातील सिडनीमध्ये मध्यवस्तीतील एका कॅङ्गेमध्ये इराणी अपहरणकर्त्याने १५ लोकांना ओलीस ठेवण्याच्या घटनेच्या पाठोपाठ पाकिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमध्ये शंभरहून शाळकरी मुलांना जीवे मारण्यात आल्याची भयानक घटना घडली. या  दोन्ही घटनांमुळे जगातील वाढत्या दहशवादाचा एक क्रूर चेहरा समोर आला. अलीकडच्या विविध दहशतवादी कारवायांमधील समान धागा म्हणजे या दहशतवाद्यांचा धर्म. या धर्माचा विपर्यास करून हे दहशतवादी अशा कारवाया करत आहेत अशी सारवासारव नेहमी केली जाते. दहशतवादाच्या मुळाशी धार्मिक विचारसरणी आहे तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ओलीस ठेवलेल्यांना त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि दहशतवाद्यांनी त्यांच्या धर्माच्या लोकांना सोडून दिले हे जगजाहीर आहे. परंतु एवढे होऊनही  या हल्ल्याच्या प्रत्त्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या सर्व धार्मिक संस्कारासह सन्मानाने दङ्गन केले गेले. आज पाकिस्तान आणि त्यातल्या त्यात पाकचा सरहद्द प्रांत हे जागतिक दहशतवादाचे केंद्र बनले आहे. इतिहासात हा गांधार देश म्हणून ओळखला जात असे. अगदी १३ व्या शतकापर्यंत इथले लोक बौध्द धर्मिय होते. परंतु १३ व्या शतकानंतर या सर्व भागाचे इस्लामीकरण झाल्यानंतर इथे टोळीवाद आणि पिढ्यानपिढ्या परिवारांमध्ये सूडचक्र चालणे ही नित्याची बाब झाली आहे. अशा परिस्थितीत पेशावरमध्ये पाकिस्तानी सैन्याने चालवलेल्या शाळेवर हल्ला करून, तिथल्या काही विद्यार्थ्यांंना ठार करून, काहींना ओलीस ठेवून तालिबानी दहशतवादी पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवत आहेत. अशा पध्दतीने दहशतवादी हल्ल्यात निष्पाप मुलांचा इतक्या मोठ्या संख्येने बळी जाण्याची ही पहिलीच घटना असावी. या घटनेने संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी लढा देणार्‍या मलाला युसुङ्गजई हिला नुकतेच नोबेल या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याने मलालाने सांगितले होते. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील सैनिकी शाळेला लक्ष्य केले. ही मलालाच्या विरोधातील प्रतिक्रिया तर नसावी ना, असा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण होत आहे. कारणे काहीही असले तरी एकेकाळी  पाकिस्तानने पोसलेला दहशतवाद आज त्याच देशासाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. या दहशतवादाला आटोक्यात कसे आणायचे हा पाकिस्तानसमोरील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पेशावर ही काश्मीरमधील सरहद प्रांताची राजधानी आहे. तिथे सध्या इम्रानखानच्या तहेरिक ए इन्साङ्ग पक्षाचे सरकार आहे. बाकी पाकिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांविरूध्द वातारण निर्माण झाले असताना इम्रानखानच्या सरकारने मात्र तालिबान्यांशी नरमाईने वागण्याचे धारेण अवलंबले होते. अशा प्रकारे वजिरिस्तानातील दहशतवादी आापल्या प्रांतात येण्यापासून परावृत्त होतील अशी त्यांची भाबडी कल्पना  होती. परंतु त्या कल्पनेला पेशावरचमधील शाळेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरूंग लागला आहे. परंतु आता या घटनेनंतर इम्रानखान वा त्याचा पक्ष तालिबानविरोधात उभे राहतील असे वाटते. तसे झाल्यास संपूर्ण पाकिस्तानात तालिबान विरोधात सैनिकी कारवाई करण्याबाबत राजकीय पक्षात एकमत होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत पाकिस्तानने केवळ भारताविरूध्द  दहशतवाद करणार्‍यांना दहशतवादी न मानण्याचे धोरण अवलंबले होते. परंतु आता भारताने सीमेवर तारेचे कुंपण घातले असून गस्तही वाढवली आहे. यामुळे दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करणे कठीण ठरत आहे. अशा परिस्थितीत हे बेकार दहशतवादी पाकिस्तानातच कारवाया करत आहेत. जागतिक स्तरावर गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादाची सम्यक व्याख्या करून राष्ट्रसंघामध्ये सर्व देशांवर बंधनकारक असा निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु आजपर्यंत जागतिक स्तरावर दहशतवाद आणि दहशतवादी यांची व्याख्या करण्यावरच मतभेद आहेत. एका देशाचा दहशतवादी हा दुसर्‍या देशाकरता स्वतंत्र योध्दा मानला जातो. काश्मीरबाबत पाकिस्तानचे हे दुटप्पी धोरण कायम राहिले आहे. परंतु यातून वाट काढण्याकरता दहशतवादी घटना उदाहरणार्थ हॉस्पिटल, स्टेशन, हॉटेल्स किंवा सार्वजनिक जागा जिथे लष्कराचा किंवा पोलिसांचा काही संबंध नाही अशा ठिकाणचे हल्ले  म्हणजे दहशतवादी हल्ले अशी व्याख्या करता येऊ शकते. अर्थातच काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या तळावर केलेला हल्ला हा दहशतवादी हल्ला म्हणता येत नाही. तो हल्ला म्हणजे पाकिस्तानने भारताविरूध्द चालवलेल्या गनिमी युध्दाचाच तो एक भाग होता असे आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे स्पष्ट व्याख्या केल्यास दहशतवादी घटना आणि इतर हल्ले यात ङ्गरक करून दहशतवाद्यांविरूध्द जागतिक स्तरावर मोहिम उघडता येऊ शकते. या व्याख्येप्रमाणे  मुंबईवरील हल्ला हा दहशतवादी हल्ला ठरतो आणि त्याला ङ्गूस देणारा हाङ्गीज सईद हा दहशतवादी ठरतो. संयुक्त राष्ट्र संघातर्ङ्गे अशा प्रकारे सर्व देशांना बंधनकारक अशी व्याख्या आणि दहशतवाद्यांना देण्यात यावयाची शिक्षा  या बाबी मान्य झाल्या तर हाङ्गीज सईदसारख्यांना पाकिस्तानमध्ये सुध्दा मोकाट ङ्गिरता येणार नाही. थोडक्यात, दहशतवादाविरूध्द जागतिक स्तरावर लढाई लढण्याकरता संयुक्त राष्ट्रसंघ हेच उत्तम व्यासपीठ आहे. त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली दहशतवाद चालवणार्‍या संघटनांवरसुध्दा संपूर्ण जगात बंदी घालण्याची आवश्यकता आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel