-->
पर्ण चिकित्सा प्रभावी, साइड इफेक्टही नाही

पर्ण चिकित्सा प्रभावी, साइड इफेक्टही नाही

 Apr 01, 2013 ON NIRAMAY

विविध रोपांच्या पानांमध्ये थायरॉइड, मूळव्याध, अतिसार, किडनी आणि यकृताचे रोग, दमा, टीबी, मायग्रेन (अर्धशिशी), पाठदुखी, मधुमेह, त्वचारोग, सांधेदुखी, हृदयरोग तसेच कॅन्सरही बरा करण्याचे सामर्थ्य असते. मुंबईतील मालाड या पश्चिम उपनगरात निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. राज मर्चंट यांच्या दीड एकरच्या बागेत 600हून अधिक औषधी वनस्पती आहेत. त्यांनी विविध वनस्पतींचा कसा उपयोग होतो याची दिलेली माहिती...
कढीपत्त्यात दोन डझनांपेक्षाही जास्त रोग बरे करण्याची शक्ती :
भाजीवाल्याकडून मिरची-कोथिंबीर घेताना ‘जरा कढीपत्ता पण टाक रे’ म्हणून आपण कढीपत्ता घेतो. भाजीवाला त्या कढीपत्त्याचे पैसे घेत नाही. अगदी सहजपणे आपण कढीपत्त्याचा वापर करत असतो. काही वेळा तर कढीपत्ता नसला तरी ‘काही बिघडत नाही’ असे म्हणतो. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ असे काहीसे कढीपत्त्याचे झाले आहे. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की सहजपणे उपलब्ध असणार्‍या या कढीपत्त्यात दोन डझनांपेक्षाही जास्त रोग बरे करण्याची शक्ती आहे. ‘याची तीन पाने जरी रोज चावून खाल्ली तरी आयुष्यभर रोग आपल्या आजूबाजूला फिरकणार नाहीत.’ भाजी-आमटी करताना वापरल्या जाणार्‍या कढीपत्त्यात मधुमेह, रक्तदाब, अकाली केस पिकणे-गळणे, यकृत, डोळ्यांचे विकार, अपचन, दमा या सर्वांवर उपचार करण्याची शक्ती आहे.
प्रत्येक रोपात काही ना काही औषधी गुणधर्म असतातच : विविध रोपांच्या पानांमध्ये थायरॉइड, मूळव्याध, अतिसार, किडनी आणि यकृताचे रोग, दमा, टीबी, मायग्रेन (अर्धशिशी), पाठदुखी, मधुमेह, त्वचारोग, सांधेदुखी, हृदयरोग तसेच कॅन्सरही बरा करण्याचे सामर्थ्य असते.  प्रत्येक रोपात काही ना काही औषधी गुणधर्म असतातच. आयुर्वेद हे निसर्गोपचाराचे एक अंग आहे.
झाडावरून पाने तोडून लगेच चावून खाणे :
पर्ण चिकित्सा आयुर्वेदापेक्षाही अधिक प्रभावी आणि सोपी आहे. कारण झाडे त्यांच्या मुळ्या वाळवणे, चूर्ण करणे, मिश्रण करणे यांची काहीच गरज भासत नाही. पर्णचिकित्सेमुळे काहीही दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) होत नाहीत. झाडावरून पाने तोडून लगेचच खाल्ल्यामुळे त्यांचा लवकर प्रभाव पडतो. झाडावरून पाने तोडल्यावर सात दिवसांच्या आत त्यांचा वापर व्हायला हवा, अन्यथा त्यातील औषधी गुणधर्म कमी होतात.

प्रत्येक रोपाचा गुणधर्म
प्रत्येक रोपातील औषधी गुणांचा शोध घेऊ. गाजराचा रस स्थौल्य, कॅन्सर, नेत्रविकार, सोरायसिस, फायब्रेसिस यांवर खूप प्रभावी आहे. कोथिंबिरीमुळे पचन, नेत्ररोग, कोलेस्टेरॉल, अधिक प्रमाणातील रजस्राव यावर नियंत्रण राहते. लवंग-दमा, खोकला, सर्दी, डोकेदुखी, दातदुखी, पचनाच्या तक्रारी, कॉलरा, यावर गुणकारी आहे. मेथीमध्ये रक्तक्षय, श्वास दुर्गंध, घामाची दुर्गंधी, ताप यावरील उपाय आहेत. लसणामध्ये टीबी, छातीत दुखणे, दमा, उच्चरक्तदाब, हार्ट अ‍ॅटॅक, कॅन्सर, जखम भरून न येणे तसेच रक्ताच्या विकारांवर उपचार करण्याचे सामर्थ्य आहे. कांद्यामुळे दमा, त्वचा यांचे रोग बरे होतात.

0 Response to "पर्ण चिकित्सा प्रभावी, साइड इफेक्टही नाही"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel